हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Childhood Obesity) प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे आरोग्य फार महत्त्वाचे असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात एक वेळ पालक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतील पण मुलांच्या आरोग्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देतात. असे असूनही मुलांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या मुलांच्या सवयी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आपली मुलं जर सतत आजारी पडत असतील तर त्यांच्या मुख्य सवयींकडे सर्वात आधी लक्ष द्या.
गेल्या काही काळात लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढण्याचे प्रमाण दिसून आले आहे. रोजची धावपळ, हा क्लास- तो क्लास, अभ्यासाचा ताण, खेळाची आवड असे असूनही मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतोय? (Childhood Obesity) याबाबत अनेक पालक चिंता व्यक्त करत आहेत. लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे एक वेगळेच क्रेझ आहे. त्यामुळे अनेकदा मुलं घरातील आहार करणे टाळतात. घरात मेथीची भाजी बनवली असेल तर मुलं नाक मुरडतील. पण जर तीच मेथी फ्युजन पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवली तर मात्र मुलं आवडीने खातात. मुलांच्या आवडीनिवडी जपायच्या नादात अनेकदा पालक त्यांचे खाण्यापिण्याच्या बाबतीत चुकीचे हट्ट पुरवतात. परिणाम, मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा.
आपली मुलं गुटगुटीत असणे, सुदृढ असणे आणि लठ्ठ असणे यात खूप फरक आहे. त्यामुळे मुलाच्या वाढत्या लठ्ठपणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुलांच्या काही अशा सवयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. या सवयींना वेळ असताच आळा घाला. अन्यथा भविष्यात आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
मुलांमध्ये स्थूलपणा वाढण्याची कारणे (Childhood Obesity)
चुकीचा आहार
आपल्या मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक त्यांना आहारातून मिळत असतात. त्यामुळे घरगुती, सकस आणि पूर्ण आहार मुलांसाठी कधीही फायदेशीर ठरतो. मात्र, गेल्या काही काळात खाण्याच्या पद्धतीत झालेला बदल मुलांना सकस आहारापेक्षा जंक फूडकडे आकर्षित करतो, चिप्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज अशा पदार्थांचे सेवन केल्याने मुलांमध्ये फॅटचे प्रमाण वाढते. परिणामी मुलांमधला लठ्ठपणा वाढत जातो आणि मूलं सुस्त होतात.
कमी हालचाल
मुलांना बसल्या जागी खाण्याची, झोपण्याची सवय असेल तर सर्वात आधी ही सवय मोडा. यामुळे मुलं एकाच ठिकाणी बसून सगळी काम करतात. (Childhood Obesity) परिणामी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. ज्यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जादायी कॅलरीज साठून राहतात आणि यामुळे मुलं लठ्ठ होऊ लागतात.
ताणतणाव
जर तुमची मुलं अभ्यासाचा ताण घेत असतील तरीही त्यांची जाडी वाढू शकते. कारण आजच्या डिजिटल युगात एकीकडे सगळं काही अत्याधुनिक होत असताना मुलांचा इंटरनेटचा वापर वाढला आहे. (Childhood Obesity) त्यामुळे जगात सुरु असलेल्या स्पर्धेचे मुलांना ज्ञान असते. परिणामी मुलांच्या मनात आपल्या स्थानाविषयी असुरक्षितता निर्माण होते आणि मुलं टेन्शन घेऊ लागतात. याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो आणि वजन वाढण्यास सुरूवात होते.
मैदानी खेळांचा अभाव
(Childhood Obesity) आजकाल मुलं कबड्डी, खो- खो, फुटबॉल, मॅरेथॉन असे मैदानी खेळ खेळतच नाहीत. त्यांना एकतर व्हिडीओ गेम लागतात. नाहीतर प्ले झोनमधील खेळ खेळणे मुलं पसंत करतात. यामुळे मुलांची मैदानी खेळात लागणारी शारीरिक ऊर्जा खर्च होत नाही. उलट सतत बसून बसून खेळण्याने मुलं सुस्त आणि आळशी होतात. परिणामी त्यांच्यातील लठ्ठपणा वाढत जातो.
औषधांचे अतिसेवन
अनेक घरात मुलांना सर्दी झाली, खोकला आला साधं डोकं किंवा पोट जरी दुखलं तरी काही ना काही औषधे दिली जातात. यामुळे मुलांना लहान सहन दुखण्यावर औषध घेण्याची सवय पडते. यामुळे प्रत्येक बारीक सारीक आजारपणात मुलं औषध घेतात. या औषधांमध्ये सर्रास स्टिरॉईडचा वापर करण्यात येतो. अशावेळी मुलांनी स्टिरॉईडचे अधिक सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. (Childhood Obesity)
होऊ शकतात गंभीर परिणाम
मुलांच्या वाढत्या लठ्ठपणाकडे वेळीच लक्ष न दिल्याने मुलांची शारीरिक क्षमता कमी होते. शिवाय शिवाय पचनक्रिया देखील मंदावते. याशिवाय धाप लागणे, दम लागणे अशा समस्या निर्माण होतात. इतकेच नव्हे तर वाढत लठ्ठपणा मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. रक्तदाबाचा समस्या, दमा, हृदय विकार आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Childhood Obesity)
याशिवाय मुलांमध्ये स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण होतो. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील पडू शकतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करू नका. तर मुलांना चांगल्या सवयी लावा आणि लठ्ठपणावर नियंत्रण आणा.