ऐतिहासिक निर्णय !! राज्यातील ‘या’ गावात लहान मुलांना Mobile वापरण्यास बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईलचे वेड सर्वानाच आहे. लहान मुलांसोबत ते जेष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या हातात कायमच मोबाईल दिसतो. मोबाईल शिवाय तर काही लहान मुलांना जेवणही जात नाही. मोबाईलच्या अतिरेकामुळे लहान मुलांवर मोठे दुष्परिणाम होतात. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी या गावात लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. असा क्रांतिकारक निर्णय घेणारे बान्सी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरलं आहे.

11 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गावातील १८ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईल फोनच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी, आणि मुलांना चांगले वळण लावण्यासाठी बान्सी ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरातून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

बान्सी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोबाईल बंदी व्यक्तिरिक्त अजून २ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे आणि निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबाईल वापर कमी झाला तर मुलांचे आरोग्य चांगले राहू शकते. याशिवायविद्यार्थ्यांचे अभ्यासाकडेही लक्ष केंद्रीत होईल अशी आशा ग्रामपंचायतीला आहे.अशाप्रकारचे क्रांतिकारक निर्णय घेऊन ग्रामसभेने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.