Tuesday, June 6, 2023

पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला काळिमा फासला आहे. या नराधमांनी आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. हे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घरगुती हिंसाचारासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मुन्नवर अब्बास अली नईमाबादी असं 57 वर्षीय पीडित महिलेचं नाव आहे. त्या गृहिणी असून पुण्यातील सिनेगाँग रोड परिसरातील गीता हाऊसिंग सोसायटीत राहतात. तर अहेमद अब्बास अली नईमाबादी आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी अशी नराधम मुलांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेची नणंद आणि दीर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी पीडित महिलेच्या नावावर असणारं घर बळकवण्यासाठी मागील काही काळापासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. आरोपींनी संपत्तीमधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ केला आहे.

या हल्ल्यात पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलाच्या हल्ल्यानंतर फिर्यादी नईमाबादी खाली कोसळल्या, त्यानंतर घरातील अन्य कुटुंबीयांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून त्या तशाच अवस्थेत जीव वाचवत त्या आपल्या भावाच्या घरी नाना पेठ या ठिकाणी गेल्या आहेत. याप्रकरणी पीडित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.