Thursday, March 23, 2023

आता बालकांना मिळणार न्यूमोनियावरील लस मोफत

- Advertisement -

औरंगाबाद : न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक सहा बालकामागे एकाचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो. त्यामुळे न्यूमोनियावरील म्युमोकोकस आता एका वर्षाखालील बालकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

औरंगाबाद महापालिकेला दोन हजार लसी प्राप्त झाल्या असून महापालिकेच्या 38 आरोग्य केंद्रावर ही लस लवकरच दिली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी सांगितले. डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, एका वर्षाच्या आतील बालकांनाच मोफत न्यूमोकोकल लसीचा डोस दिला जाणार आहे दीड महिना, साडेतीन महिने, नऊ महिनेअसे लसीची टप्पे असतील. यापूर्वी ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होती.

- Advertisement -

प्रत्येक डोसलाला पाच हजार रुपये मोजावे लागतात. तीन साडेतीन साधारपणे 15 हजारांचा खर्च येतो. शहरात 25 ते 30 हजार बालके, दीड महिन्याच्या बालकांना मोफत न्यूमोकोकल डोस देण्याकरिता दोन हजार लसी मिळालेल्या आहेत. महापालिकेच्या 38 आरोग्य केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.