औरंगाबाद | दीड वर्षीय चिमुकली गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडली असता गंभीर जखमी झाल्यामुळे तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.
श्रेया आकाश ढगे राहणार विजय नगर गारखेडा परिसराचे चिमुकलीचे नाव आहे. श्रेया गच्चीवर खेळत होती, त्यावेळी अचानकपणे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तेव्हा तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती.
त्यावेळी तिच्या वडिलांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्यानंतर तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना श्रेयाचा रात्री मृत्यू झाला. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.