Sunday, April 2, 2023

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे आता समोर आले आहे.

द गार्डियनमधील प्रसिद्ध वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्या पूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. बिजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक संपण्यापूर्वी युक्रेनवर हल्ला करू नये, असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. यासंदर्भात माहिती देताना न्यू यॉर्क टाईम्सने, बायडेन प्रशासनातील अधिकारी आणि एका युरोपियन अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे.

- Advertisement -

मात्र, वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांच्या म्हणण्यानुसार, ‘अमेरिकेचे हे अहवाल केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्यांना कोणताही आधार नाही. आरोप करणं आणि चीनची बदनामी करणं हा त्याचा उद्देश आहे’