अखेर चीननं गलवान खोऱ्यात आपले सैनिक मारले गेल्याचं केलं मान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं कबूल केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यातील संघर्षात ठार झालेल्या १६ चिनी जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे.

दरम्यान, १५ आणि १६ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याचं भारताने जाहीर केल्यानंतरही चीन मात्र शांत होतं. या संघर्षात चीनच्या लष्कराचेही मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात होत. परंतु चीनकडून आपल्या जखमी किंवा ठार झालेल्या जवानांची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पण पहिल्यांदाच चीनकडून अधिकृतपणे जवान ठार झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे.

चीनमधील काही विश्लेषक आणि निरीक्षकांनी भारतीय अधिकारी भारतीयांना दिलासा देण्यासाठी चीनमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी भारतापेक्षाही जास्त असल्याचं सांगत असल्याचा आरोप केला होता. ग्लोबल टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचाही उल्लेख केला आहे. व्ही के सिंग यांनी शनिवारी चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, चीनच्या ग्लोबल टाइम्सने ‘चिनी तज्ञ’ या लेखात तणाव वाढू नये यासाठी चीन लडाखमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी जाहीर करत नसल्याचं सांगितलं होतं. जर चीनने २० पेक्षा कमी जवानांचा आकडा जाहीर केला तर भारतीय सरकार पुन्हा दबावात येईल असं ट्विट ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment