ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला मान्य नाही आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की,’भारत आणि चीन न्यायालयीन पद्धतीने नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये वाटाघाटी करत आहेत जेणेकरून हे प्रकरण शांततेने सुटू शकेल.

त्यांनी सांगितले की १९९३ पासून भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी ५ करार केले गेले आहेत. हे प्रकरण सोडविण्यासाठी दोन्ही देश यावर काम करत आहेत.

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत नुकतेच एक ट्विट केले होते की, “आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही माहिती देऊ इच्छितो की अमेरिका या दोघांमधील सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार आहे. धन्यवाद.”

लडाखमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये तणाव
५ मे रोजी सुमारे २५०चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यावर लडाखमधील परिस्थिती अधिक तणावग्रस्त बनली आणि त्यानंतर स्थानिक कमांडर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली. या घटनेत भारतीय आणि चिनी बाजूचे १०० सैनिक जखमी झाले. उत्तर सिक्कीममध्येही ९ मे रोजी अशीच एक चकमक झाल्याचे उघडकीस आले.

पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली
पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चिनी सैन्यांदरम्यान तणाव वाढल्याने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ संरक्षण जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बैठक घेतली. बाहेरील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या लष्करी सज्जतेला बळ देण्यावर यामध्ये भर देण्यात आला.

मंगळवारी पंतप्रधान मोदींशी झालेल्या बैठकीपूर्वी या तिन्ही सैन्य प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पॅनयांग सो तलाव, गॅलवान व्हॅली, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली. जेथे गेल्या २० दिवसांपासून भारत आणि चीनचे सैनिक आक्रमक भूमिका घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.