चीनकडून Amazon, Flipkart सह या कंपन्यांवर कारवाई, बनावट उत्पादने विकल्याचा आहे आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । BOYA ब्रँड नावाने वायरलेस मायक्रोफोन आणि इतर सामानाची निर्मिती तसेच निर्यात करणारी चिनी कंपनी Shenzhen Jiayz Photo Industrial Ltd ने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यांच्या उत्पादनांची बनावट आवृत्तीची विक्री केल्याचा आरोप केला आहे. फ्लिपकार्ट (Flipkart), अ‍ॅमेझॉन इंडिया( Amazon India), पेटीएम इंडिया (Paytm Mall), टाटा क्लिक (Tata Cliq) आणि स्नॅपडील (Snapdeal) यांनी आपल्या उत्पादनांच्या बनावट आवृत्त्या विकल्या असल्याचा आरोप या चिनी कंपनीने केला आहे.

46 जणांविरोधात तक्रार दाखल
चिनी कंपनीने अनेक ई-कॉमर्स कंपन्या आणि त्यांच्या विक्रेत्यांसह 46 लोकांविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. दाखल केलेल्या याचिकेनुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म BOYA ची बनावट उत्पादने विकून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, बर्‍याच ग्राहकांकडून याबाबत तक्रारी आल्या आहेत ज्यामुळे कंपनीची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा खराब झाली आहे.

कोर्टाने या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली
या प्रकरणाची पहिली सुनावणी गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात झाली होती त्या दरम्यान अंतरिम आदेश पारित करण्यात आला होता. ज्यामध्ये विक्रेत्यांना या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही उत्पादने विक्री करण्यास मनाई आहे.

मूल्यांकनमध्ये सापडले सेम सीरियल नंबर वाले प्रोडक्ट
ग्राहकांच्या तक्रारींवर, शेन्झेन झियाझ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकल्या जाणाऱ्या बनावट उत्पादनांचे आणि त्यांच्या विक्रेत्यांचे मूल्यांकन करीत आहेत, ज्यांची सेम सीरियल नंबरची उत्पादने आहेत. BOYA चे सल्लागार म्हणाले, “आम्ही यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे आणि आरोपीना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन या 42 विक्रेत्यांना त्वरित हटवण्यास सांगितले आहे.”

कोर्टाच्या आदेशाचे पालन करून बनावट वस्तूंची विक्री करणार्‍या आरोपी विक्रेत्यांना काढून टाकल्याचेही स्नॅपडीलने या संदर्भातले स्पष्टीकरण जारी केले आहे. बनावट वस्तूंविरूद्ध स्नॅपडीलचे कठोर धोरण आहे आणि त्याचे ते काटेकोरपणे पालन करतात. तथापि, या विषयावर अ‍ॅमेझॉन इंडिया आणि पेटीएम मॉलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment