बीजिंग । चीनची प्रसिद्ध अभिनेत्री Zheng Shuang ला आज (शुक्रवार) कर चुकवल्याबद्दल 46 मिलियन डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. शांघायच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने Zheng ला टॅक्सची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल दंड ठोठावला. या अभिनेत्रीने 2019 ते 2020 पर्यंत जेवढे टीव्ही कार्यक्रम केले त्याद्वारे मिळालेल्या रकमेची योग्य माहिती विभागाला दिलेली नाही असा आरोप लावण्यात आला आहे.
30 वर्षीय Zheng Shuang एक फेमस कलाकार आहे. 2009 मध्ये, तिला तैवानी चित्रपट मेटियोर शॉवर नंतर प्रसिद्धी मिळाली. इन्कम टॅक्स चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चायना ब्रॉडकास्टिंग ऑर्गनायझेशनने या अभिनेत्रीला सर्व शोमधून काढून टाकले आहे. तसेच, भविष्यात तिला कोणतेही काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य टीव्ही, चित्रपट आणि रेडिओ प्रशासनाने असेही म्हटले की,” Zheng Shuang च्या संस्थेला आता कोणतेही स्थान नाही. आपण जनतेसाठी स्वच्छ आणि प्रामाणिक साहित्यिक आणि कलात्मक वातावरण निर्माण केले पाहिजे.”
WEIBO चीनच्या सोशल साईटने Zheng चे ऑफिशियल अकाउंटही सस्पेंड केले गेले आहे. गुरुवारी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ट्रेंडवर होती. चीनमध्ये अनेक कलाकारांवर सातत्याने बंदी घातली जात आहे. या महिन्यात प्रसिद्ध गायक ख्रिस वूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.