५ भारतीय नागरिकांचे चिनी सैन्यानं केलं अपहरण; काँग्रेस आमदारचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इटानगर । भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील तणाव अजून निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचलच्या सुबनसिरी जिल्ह्यातील ५ भारतीय नागरिकांचं कथितरित्या अपहरण करण्यात आलंय. अपहरण करण्यात आलेले पाच लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आलं. अपहृत नागरिकांच्या एका नातेवाईकानं ही माहिती दिलीय. काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग (Ninong Ering, Congress MLA) यांनी हा धक्कादायक खुलासा केलाय.

निनाँग एरिंग यांनी आज यासंदर्भातील ट्विट करत सांगितली कि, “सुबनसिरी जिल्ह्यातील ५ लोकांचं कथितरित्या पीएलएनं अपहरण केलं आहे. पाच महिन्यांपूर्वीही अशी घटना घडली होती,” असं एरिंग म्हणाले. तसंच पीएलए आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला याचं सडेतोड उत्तर दिलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटसोबत ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलं त्यांची नावंदेखील दिली आहेत.

ज्या लोकांचं अपहरण करण्यात आलंय त्यांची नावं टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारू डिरी अशी आहेत. पाच जणांसोबत आणि दोन जण त्या ठिकाणी उपस्थित होतं. परंतु अपहरणापूर्वी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनीच याची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment