संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था लॉकडाउन करून चीनची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु; पहा आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहा महिन्यांपूर्वी जगाला कोरोना विषाणूच्या संकटात अडकवलेला चीन आता कोरोनाच्या महामारीतून सावरला आहे. दुसऱ्या तिमाहीत चीनचा विकास दर ३.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीची आर्थिक आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्यात चिनी अर्थव्यवस्थेचा विकासदर ३.२ टक्के झाला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे संकेत आहेत. डिसेंबरमध्ये चीनमधील वूहान शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. जानेवारीपासून यात झपाट्याने वाढ झाली. ज्यामुळे चीनला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. जवळपास तीन महिने चीनमध्ये लॉकडाउन होता. या काळात चीनचा विकासदर दशकभराच्या नीचांकापर्यंत खाली आला होता.

चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनचा विकासदर १.६ टक्के झाला.  पहिल्या तिमाहीत कोरोनामुळे चीनचे मोठे नुकसान झाले. विकासदर ६.८ टक्क्यांनी घसरला. कोरोनाचा फैलाव कमी झाला आणि चीनी सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयायोजना सुरु केल्या. एकीकडे चीनमधून कोरोनाचा इतर देशांत झपाट्याने प्रसार केला. आशियातील इतर देशांमध्ये चीननंतर कोरोना मोठ्या संख्येने पसरला आहे. कोरोना विषाणू आणि त्यानंतर सीमेवरील तणाव यामुळे देशात चीन विरोधी वातावरण आहे. चीनबद्दल जगात असंतोष असताना चीनमध्ये मात्र विकासदर वाढताना दिसतो आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि आक्रमक विस्तारवादी धोरणाच्या विरोधात अमेरिका आणि इतर देशांनी चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारताने चीनचे बरेच ऍप बंद केले आहेत. अमेरिकेने चीनच्या दोन टेलिकॉम कंपन्यावर बंदी घातली. आता ब्रिटननेही चीनला धक्का देत ‘हुवैई’ कंपनीच्या ५ जी नेटवर्कवर बंदी घातली आहे.  ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनसीएससीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे. ब्रिटीश टेलिकॉम कंपन्यांनी २०२७ पर्यंत ५ जी नेटवर्कमधील हुवैई कंपन्यांचे उपकरण हटवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे हुवैईचे मोठे नुकसान होणार आहे. ब्रिटनचे डिजीटल, सांस्कृतिक, माध्यम विभागाचे सचिव ऑलिव्हर डाउडेन यांनी सांगितले की, ५ जी तंत्रज्ञान हे देशाला बदलणारे तंत्रज्ञान असणार आहे. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधांवर विश्वास आणि सुरक्षेच्या मुद्यावर आम्ही आश्वस्त असल्यावरच हे होऊ शकते, असेही त्यांनी सांगतिले.

हे पण वाचा –

COVID 19 मधून बरे झाल्यावर कमी होते शरीरातील अँटीबॉडीजची संख्या, दुसऱ्यांदा देखील होऊ शकते संक्रमण – जर्मनीच्या डॉक्टरांचा दावा  

खुशखबर! अमेरिकेत कोरोनावरील लसीचा प्रयोग यशस्वी

धक्कादायक ! रुग्णालयातील मोफत wifi वापरून रूग्णाने डाउनलोड केले तब्ब्ल 80 हजार अश्लील व्हिडीओ

या खेळाडूला आर्थिक समस्यांमुळे विकावी लागत आहे नुकतीच घेतलेली BMW कार!

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

Leave a Comment