चीनच्या सरकारी कंपनीने टिकटॉकच्या मालकीच्या बाइट डान्स, वीबो चॅटमध्ये केली गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । चीन सरकारने देशातील व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकच्या मालकीचे बाइटडन्स आणि चॅट अ‍ॅप वीबो या दोन अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. असे मानले जाते की, ही गुंतवणूक चीनमध्ये वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रावर प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने केली गेली आहे.

सार्वजनिक सरकारी नोंदी आणि कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म किचाचा यांच्या मते, एप्रिलमध्ये, बाइट डन्सने आपली चीनी उपकंपनी बीजिंग बाइटडन्स टेक्नॉलॉजीमधील एक टक्के हिस्सा सार्वजनिक क्षेत्रातील फर्म वांगटौझोंगवेन (बीजिंग) टेक्नोलॉजीला विकला.

चीनच्या सरकारी अधिकाऱ्यालाही बोर्डात स्थान
वांगटौझोंगवेनची मालकी चीनच्या तीन सरकारी संस्थांच्या मालकीची आहे. यूएस टेक्नॉलॉजी वेबसाईट द इन्फॉर्मेशनने यापूर्वी बातमी दिली होती की, बाइट डन्सने या कराराचा एक भाग म्हणून चीनच्या एका सरकारी अधिकाऱ्यालाही बोर्डामध्ये ठेवले आहे. बाइट डन्सच्या प्रवक्त्याने बोर्डात गुंतवणूक आणि प्लेसमेंटबद्दल प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.

दरम्यान, नॅस्डॅकवर लिस्टेड असलेल्या वीबोने अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की,” वांगटोटाँगडा (बीजिंग) टेक्नॉलॉजी कं. लिमिटेड नावाच्या संस्थेने सुमारे 10.7 कोटी युआनची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी वांगतोझोंगवेन (बीजिंग) तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. या कराराअंतर्गत, वीबोच्या चीनी उपकंपनीतील एक टक्के हिस्सा विकत घेतला गेला आहे.

TikTok भारतात परतण्याचा प्रयत्न करत आहे
भारतात TikTok वर बंदी आहे. आता कंपनी सतत पुन्हा इथे परतण्याचा प्रयत्न करत आहे. TikTok साठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. परंतु भारत आणि चीनमधील वाद वाढल्यानंतर येथे बंदी घालण्यात आली.

TikTok भारतात लवकरच पुनरागमन करू शकते कारण त्याची मूळ कंपनी ByteDance ने कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सकडे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अ‍ॅपसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. बंदीनंतर लगेचच, TikTok अ‍ॅप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आणि भारतीय नेटवर्कमध्ये एक्सेस बंद करण्यात आला. तथापि, याचा फायदा घेत इंस्टाग्रामसह अनेक प्लॅटफॉर्मने भारतीय युझर्ससाठी समान अनुभव एकत्रित केला, जो मूळतः TikTok वर उपलब्ध होता.

Leave a Comment