हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chinnaswamy Stampede। भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा आयकॉन खेळाडू विराट कोहलीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरसीबीच्या विजयानंतर पार पडलेल्या व्हिक्टरी परेड दरम्यान, जी चेंगराचेंगरी झाली आणि १० ते १२ लोकांचा मृत्यू झाला त्याप्रकरणी विराट कोहली विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. नायजा होर्टागारा वेदिके यांचे प्रतिनिधी ए.एम. वेंकटेश यांनी शुक्रवारी क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) विरोधात तक्रार दाखल केली. मात्र त्यांच्या तक्रारीनंतरही कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
विराट कोहली विरोधात तक्रार मिळाल्यानंतर, पोलिस विभागाने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. याबाबत पोलिसांकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हंटल कि, सामाजिक कार्यकर्ते वेंकटेश यांनी विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये १२३/२०२५ अंतर्गत आधीच नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याची चौकशी केली जाईल.
तत्पूर्वी, कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट कंपनी डीएनए आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय समितीने आवश्यक सरकारी परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित केला होता. एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांचा समावेश आहे, ज्यामध्ये कलम १०५ समाविष्ट आहे, जे खून नसून जाणूनबुजून मृत्यूसाठी (Chinnaswamy Stampede) जबाबदार असलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरसीबीचे वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी निखिल सोसाळे यांच्यासह ४ जणांना अटक केली आहे. निखिल सोसाळे हे बंगळुरूहुन मुंबईला जात होते, त्याच वेळी आज पहाटे ६.३० वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह डीएनएचे तीन स्टाफ मेंबर्स किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्या सर्वांची क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे.
आरसीबीच्या विजयाला गालबोट- Chinnaswamy Stampede
दरम्यान, रॉयल चॅलेंजर बंगळुरू आयपीएल इतिहासात प्रथमच चॅम्पियन झाल्यानंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर व्हिक्टरी परेड काढण्यात आली होती. मात्र याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त चाहत्यांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली (Chinnaswamy Stampede) . पोलिसी बळ कमी पडलं. परिणामी या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला तर ४० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले. एकूण कार्यक्रमाला आणि आरसीबीच्या विजयाला गालबोट लागलं. कर्नाटक सरकारलाही यामुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले. बेंगळुरू मेट्रोपॉलिटन टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सीमंत कुमार सिंग यांची “तात्काळ बदली करण्यात आली आणि पुढील आदेशापर्यंत” अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि बेंगळुरू पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.




