चाकणकरांना उद्देशून शूर्पणखा म्हंटलच नाही; चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. तत्पूर्वी अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीटभाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं होतं. मात्र आपण चाकणकर यांना शूर्पणखा म्हंटल च नाही अस स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. मी फक्त एवढंच म्हटलं त्या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये. कोणीही तिथे बसेल त्यांनी रावणाला साथ देऊ नये. आता माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ घेत ते रुपाली चाकणकरांना उद्देशून असल्याच्या बातम्या चालवल्या. पण मी कोणाचंही नाव घेतला नाही अस चित्रा वाघ यांनी म्हंटल.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. हा अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांनाच टोला असल्याचं बोललं गेलं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देखील दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी स्वत:च आपल्या ट्वीटबद्दल खुलासा केला आहे.

You might also like