पूजाच्या आत्महत्येच्या दिवशी संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले ; चित्रा वाघ यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. ज्या दिवशी पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्या दिवशी वन मंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. तसेच अरुण राठोडने पोलिसांच्या 101 या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

या प्रकरणातील अरुण राठोडने पोलिसांच्या 101 क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे कबुली दिली आहे. आत्महत्येच्या दिवशीच त्यानेही कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी या कॉल रेकॉर्डची चौकशी करावी, पण पोलीस हे संपूर्ण प्रकरण झाकायचं काम करत आहे, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.

पूजा चव्हाण प्रकरणावर भाजप नेते विनोद तावडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांवर असे आरोप होतात. त्यावेळी नेतृत्वाने अतिशय संवेदनशीलपणे असायला हवं. कारण या गोष्टी लोकांच्या मनावर परिणाम करत असतात.असं असताना मुख्यमंत्री असतील किंवा पवार साहेब असतील अशा जबाबदार व्यक्तींकडून कारवाईची कृती सामान्य माणसाला अपेक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like