चित्रा वाघ म्हणतात आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं; कुंपनच शेत खात असेल तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझेंना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक दावा सिंग यांनी केला आहे. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कोण लुवाडतंय हे माहिती होणे गरजेचे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे लेखी स्वरुपात अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिस अधिकारी वाझे यांना 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सागितले गेले होते असे परमबीर सिंग यांनी म्हटलंय. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून जर कुंपनच शेत खात असेल तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे असा असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ओ बाब्बो…लो कर लो बात….अब बात निकलही गई है तो फिर दूर तलक जायेगी..अशा आशयाचे ट्विट करत वाघ यांनी यामध्ये अनेकजण सामिल असण्याची शक्यता व्यक्त करत या सर्वांचा तपास होणे गरजेचे असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्राच्या जनतेला कोण लुबाडतंय हे आता लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता धाडस दाखवावं असं म्हणत वाघ यांनी ठाकरे यांना दोषींवर तात्काळ कारवाई करावी असे आवाहन केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment