तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारीसमीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बोगस जन्म दाखल तयार करुन शेड्यूल कास्टच्या कॅटेगरीत नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यानंतर राज्यातील राजकारण तापलं असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’ असं चित्रा वाघ यांनी म्हंटल.

तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला” असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

आमची लढाई फर्जी समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. मी धर्माला घेऊन कधी राजकारण करत नाही, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, दलित मागासवर्गीय असल्याचे खोटे जात प्रमाणपत्र समीर वानखेडे यांनी बनवले. आणि एका मागासवर्गीयाचा हक्क हिरावला. मी समोर आणलेले सर्टिफिकेट खरं आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.