हा प्रायव्हेट टोल कुठला? ही वसूली कुणासाठी चालू आहे? टोलवरील कर्मचाऱ्यांच्या ‘दादा’गिरीवर चित्रा वाघांचा संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर १ एप्रिल गुरुवारपासून दरात ३% ने वाढ करण्यात आली आहे. या टोलनाक्याच्या दरवाढीचा त्रास सध्या सर्वसामान्यांना होत आहे. त्यांना जादा टोल कर आकारणी द्यावी लागत असल्याने कुणी या टोल दरवाढीबद्दल संताप तर कुणी नाराजी व्यक्त करीत आहे. येथील खेड शिवापूरमधील टोल नाका येथून जात असताना एका कुटुंबियांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्या कुटुंबातील व्यक्तीने टोलवरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला कॅमेराबद्ध केले. त्याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्विटरद्वारे शेअर करीत हा प्रायव्हेट टोल कुठला? ही वसूली कुणासाठी चालू आहे? असा प्रश्न उपस्थित करीत वाढीव टोलबाबत संताप व्यक्त केला आहे.

सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या आनेवाडी आणि खेड शिवापूर या दोन टोलनाक्यावर 5 टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. यातील खेड शिवापूर येथून एक कुटुंबीय जात असताना त्यांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यानी आडवले. तसेच वाढीव दराप्रमाणे टोल देण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार देत थेट वाढीव टोलबाबत संताप व्यक्त केला. आपल्याप्रमाणे सर्वसामान्यांनाही टोल दरवाढीच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे टोलचे जादाला पैसे देणार नाही म्हंटल्यावर १९० रूपये द्या पण पावती देणार नाही. असे टोलवरील कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच पोलिसांतही तक्रार करा अथवा पोलिसांना बोलावून आणा आम्ही त्यांना घाबरत नाही. करा त्यांच्याकडे तक्रार, असे सांगीतले. या घटनेचा व्हिडीओ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करीत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याची मागणी मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पुणे ग्रामीण पोलिसांनी करावी, अशी मागणी केली आहे.

खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर याआधी 65 रुपये टोल आकाराला जात होता. मात्र, आता तो 70 रुपये करण्यात आला आहे. एकीकडे गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी रखडलेले आहे आणि रस्ते खराब असताना देखील टोल वाढ मात्र केली जातेय. याबाबत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असतानाही या कामाचा ठेकेदार असलेल्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला मात्र यंदाही टोलवाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. आनेवाडी टोल नाक्याला मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरता 70 तर दुहेरी प्रवासाकरता 105, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे 110 आणि 170, बस किंवा ट्रककरता 235 आणि 350 तर मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 365 तर दुहेरी प्रवासाकरता ४५0 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

Leave a Comment