सातारा जिल्ह्यात स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे, ढोरोशीला पहिला नंबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील तालुका स्तरावरुन आलेल्या गावांची जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय समितीने पाहणी करून स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे (ता. जावली) व ढोरोशी (ता. पाटण) या ग्रामपंचायतीला विभागून प्रथम क्रमांक दिला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या विभागातून देण्यात आली. ग्रामपंचायत तालुकास्तरीय समितीने स्मार्ट ग्रामसाठी प्रत्येक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवड केली होती.

जिल्ह्यातील फत्यापूर (ता. सातारा), बर्गेवाडी (ता. कोरेगाव), फडतरवाडी- नेर (ता. खटाव), घाडगेवाडी (ता. खंडाळा), जाधववाडी (फ) (ता. फलटण), देवापूर (ता. माण), चोरांबे (ता. जावली), शेलारवाडी (ता. वाई), रामेघर (ता. महाबळेश्वर), ढोरोशी (ता. पाटण), तासवडे (ता. कराड) या गावांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी केली होती.

जिल्हास्तरीय समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक होवून स्मार्ट ग्राममध्ये चोरांबे (ता. जावली) व ढोरोशी (ता. पाटण) ग्रामपंचायतीला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला या निवडीची घोषणा सोमवारी झाल्यानंतर चोरांबे व ढोरोशी येथील ग्रामस्थांनी जल्लोष केला.