सरोज खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा; माधुरी दीक्षित म्हणाली..

0
73
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. माधुरी दीक्षितने हे तिचं खासगी नुकसान असल्याचं सांगितलं. सरोज खान यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शुक्रवारी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर चारकोप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सरोज खान यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. जेनेलिया डिसूजा- देशमुख, रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, सुनील ग्रोवर,अक्षय कुमार, कोरिओग्राफर रेमो डिसूजा, निमरत कौर यांनी भावुक मेसेज लिहित सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली. या सगळ्यात सरोज खान यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितही भावुक झाली.

माधुरी आणि सरोज यांनी एकत्र अनेक हिट गाणी दिली. माधुरीने इन्स्टाग्रामवर सरोज यांच्यासोबतचे फोटो शेअर करत म्हटलं की, ‘आज मला शब्द सुचत नाहीयेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून सरोजजी माझ्यासोबत होत्या. त्यांनी मला खूप काही शिकवलं. फक्त डान्सच नाही तर त्याहून अधिक त्यांनी मला शिकवलं. माझं हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखं आहे.’

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजाने सरोज यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘मी फार नशीबवान आहे की मला तुमच्यासोबत डान्स करण्याची संधी मिळाली. मला इतकं काही शिकवण्यासाठी तुमचे खूप आभार. तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल आणि तुमची नेहमी आठवण येईल.’

तर जेनेलिया डिसूजा- देशमुखने लिहिले की, ‘मी देवाचे आभार मानते की तुम्ही माझ्यासाठी नृत्यदिग्दर्शन केलं. या कठीण देव काळात तुमच्या घरच्यांना ताकद देवो.’

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here