चक्क। 65 लाख ग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । महावितरणने लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिली आहे. सद्य:स्थितीत महावितरणचे राज्यातील 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांच्या तर औरंगाबाद परिमंडलात 1 लाख 95 हजार वीजग्राहक 48 कोटी 98 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय वीज ग्राहकांना उपलब्ध आहे.

वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे. लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय,‍ भिम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेट बँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईन होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

Leave a Comment