CIBIL Score For Home Loan : मित्रानो, आपल्या हक्काचे घर असावे अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु घर बांधायचं हे काय खायचं काम नाही, त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं आवश्यक आहे. अनेकजण नवं घर बांधण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) काढतात. परंतु त्यासाठी कोणतीही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी अर्जदाराचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर चेक करते. तो योग्य असेल तरच तुम्हाला आरामात कर्ज मिळते. त्यामुळे गृहकर्जसाठी सिबिल स्कोर नेमका किती असावा हे आज आपण जाणून घेऊयात.
सिबिल स्कोर म्हणजे काय??
CIBIL स्कोअरला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असेही म्हणतात. हा एक तीन अंकी आकडा आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता सिबिल स्कोरमधून समजते. तसेच एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे तुमच्या सिबिल स्कोर वरून कळते. सिबिल स्कोर जास्त असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि कमी असेल तर मात्र कर्ज घेताना तुम्हाला अडचण येऊ शकते.
गृहकर्ज मिळविण्यासाठी सिबिल स्कोर किती असावा – CIBIL Score For Home Loan
तुम्हाला जर गृहकर्ज हवं असेल तर त्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा जास्त असणे फायद्याचे ठरेल (CIBIL Score For Home Loan) . यामुळे बँकेचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि कर्ज काढत असताना तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास, कमी व्याजदराने जास्त कर्जाची रक्कम मिळण्याची शक्यता असते, परंतु जर का तुमचा CIBIL स्कोर कमी किंवा खराब असेल तर तुमचं कर्ज रद्द होऊ शकते किंवा तुम्हाला जास्त व्याजदराने कमी कर्जाची रक्कम मिळण्याची शक्यता असते
कुठे चेक करायचा सिबिल स्कोर –
तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर चेक करायचा असेल तर त्यासाठी अधिकृत CIBIL वेबसाइट https://www.cibil.com/ ला भेट द्या. त्यानंतर ते जी काही माहिती विचारतील ती भरा मग तुमचा सिबिल स्कोर तुमच्या समोर येईल. याशिवाय तुम्ही जर गुगल पे वापरात असाल तर त्यामाध्यमातून सुद्धा अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला सिबिल स्कोर समजेल.