CID फ्रेम ‘इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स’ उर्फ दिनेश फडणीस यांचं निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्र्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सीआयडी मालिकेतून आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स म्हणजेच दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती फिल्मफेअर वरुन देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती खालवल्यामुळे दिनेश फडणीस यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर आज त्यांची वयाच्या ५७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे.

गेल्या 1 डिसेंबर पासून दिनेश फडणवीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल होती. यानंतर सोमवारी दयानंद शेट्टी यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले होते. परंतु आज त्यांनीच दिनेश फडणीस यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

दिनेश फडणीस यांच्या निधनाची बातमी देत दयानंद शेट्टी म्हणाले की, ‘क्राईम ड्रामा सीआयडीमधील फ्रेडीच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते दिनेश फडणीस यांचे यकृत निकामी झाल्याने वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले,’ या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सीआयडीच्या माध्यमातून दिनेश फडणीस यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. ते फ्रेडरिक्स या पात्रातून कायम प्रेक्षकांना हसवत राहिले. आज त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

https://www.instagram.com/p/CzIJdi1Ibnf/?igshid=ODhhZWM5NmIwOQ==