CIDCO Housing Scheme : CIDCO कडून 19000 घरांची घोषणा; किंमतीत 10 टक्के कपातही मिळणार

CIDCO Housing Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CIDCO Housing Scheme : नवी मुंबई मध्ये स्वतःचे हक्काचे घागर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. सिडकोने नवी मुंबईत तब्बल १९००० घरांची घोषणा केली आहे. हि घरे वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्वाच्या भागात उपलब्ध असतील. महत्वाची बाब म्हणजे या घराच्या सोडतीसोबतच सिडको कडून १० टक्के कपातही मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना दुहेरी लाभ होणार आहे. CIDCO च्या या निर्णयामुळे मध्यम आणि निम्न-उत्पन्न कुटुंबांवरील आर्थिक भार खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो.

सुधारित किमती विद्यमान लाभार्थ्यांसाठी तसेच नवीन अर्जदारांनाही लागू होतील, ज्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या “माझे पसंतीचे सिडको घर” योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्यांचाही समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीतील घरे लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हंटल की, या निर्णयामुळे (CIDCO Housing Scheme) नवी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न अधिक बळकट होईल. “सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे लाखो अर्जदारांना मोठा दिलासा मिळेल आणि नवी मुंबईत स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना थेट फायदा होईल. या जागतिक दर्जाच्या शहरात प्रत्येक सामान्य नागरिकाचे स्वतःचे घर असावे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तर हा निर्णय सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या घरांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. “या निर्णयामुळे अर्जदारांना कमी किमतीत घरे खरेदी करण्याची नवीन संधी मिळाली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला बळकटी मिळाली आहे. यामुळे नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत, दर्जेदार घरे मिळवणे शक्य होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कुठे अर्ज करावा – CIDCO Housing Scheme

या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजे 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. इच्छुक अर्जदारांनी अधिक माहितीसाठी www.cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.