महत्वाची बातमी ! CIDCO साठी अर्ज केलाय ? बारकोड प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट

Cidco Lottery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई-पुणे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर मिळवून देणाऱ्या संस्था म्हणून म्हाडा आणि सिडको या दोन्ही संस्थांचे नाव आवर्जून पुढे घेतलं जातं. तुम्ही जर सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला असेल किंवा करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सिडको लॉटरी साठीच्या अटींमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे.

11 ऑक्टोबरला सिडकोच्या मंडळाने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या तब्बल 26000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेला सध्या इच्छुकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. या योजनेदरम्यान अनेक अटी शर्तींची पूर्तता करत प्रक्रियेचा पुढील टप्पा गाठला जातो. मात्र याच प्रक्रियेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

बारकोड असलेले प्रमाणपत्र

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना इथून पुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्यासोबतच स्टॅम्प पेपर वरची अट सिडकोने शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय सिडकोच्या घरासाठी नव्याने अर्ज भरणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वक्षांकित शपथ पत्र सादर करता येणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून काहीच दिवस उलटल्यानंतर आता सिडकोने अटी संदर्भातली ही नवी अपडेट जारी केली आहे. इथं बारकोड नसलेलं रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात येत असले तरी वाटप पत्र देण्यापूर्वी बारकोड असलेलं रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे ठरणार आहेत तरच पुढचा अर्ज पात्र धरला जाणार आहे.

काय आहे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजना?

सिडकोनं, दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीनं खारघर, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली अशा विविध नोडमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात आली. योजनेतील सर्वाधिक, 13 हजार घरं तळोजा इथं उपलब्ध करून देण्यात आली होती.

सदर योजनेअंतर्गत अर्जदारांना 11 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी ही घरं उपलह्ध असून, यामध्ये योजनेच्या नावाप्रमाणेच अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे. राहिला प्रश्न आवश्यक कागदपत्रांचा, तर अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्राच्या पुराव्यांसमवेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र अशा पुराव्यांचीही पूर्तता करावी लागणार आहे.