Cidco Lottery : म्हाडा आणि सिडको कडून परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या वतीने बामन डोंगरी येथे उभारण्यात आलेल्या ग्राहक प्रकल्पांमधील घरांचे दर तब्बल सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सिडकोला (Cidco Lottery) घरांचे दर कमी करण्याचा निर्णय काहीसा महागात पडताना दिसत आहे. याचे कारण नक्की काय आहे ? चला जाणून घेऊया…
तर जवळपास दोन वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल उक्पन्न गटासाठी सिडकोनं नवी मुंबईच्या उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानक भागामध्ये गृहनिर्माण योजना (Cidco Lottery) जाहीर केली होती. त्याची सोडत २०२३ मध्ये पार पडली होती. त्यासाठी 4869 अर्जदार विजयी ठरले होते. या घरांची किंमत सिडकोने 35 लाख 30 हजार रुपये जाहीर केली होती. पण घरांच्या किमती जास्त असल्याचे कारण देत अनेक अर्जदारांनी मुख्यमंत्र्यांकडेच मदत मागितली होती.
घरांचा दर झाला कमी (Cidco Lottery)
त्यानंतर अर्जदारांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं 29 जानेवारी 2024 ला या घरांच्या किंमत सहा लाख रुपयांनी कमी केल्या त्यामुळे घराची किंमत थेट 29 लाख 50 हजार रुपयांवर आली. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या अडीच लाखांचं (Cidco Lottery)अनुदान जोडल्यास घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत कमी होत आहे. ही रक्कम इतक्या मोठ्या फरकानं कमी होऊनही अर्जदारांकडून मात्र त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यामुळेच किमती कमी करण्याचा निर्णय सिडकोला (Cidco Lottery) महागात पडला की काय ? असा प्रश्न निर्मण होतो आहे. त्यातही ज्या अर्जदारांनी घरं घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे त्यांचा आकडा बराच कमी असल्यामुळं आता ही घरं सिडको येत्या काळात अर्जदार विजेत्यांनी नाकारल्यास पुनर्विक्रीसाठी उपलब्ध करणार का आणि केल्यास त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.