Cidco Lottery : म्हाडा आणि सिडकोच्या घरांसाठी किती रुपये डिपॉझिट भरावे लागणार?जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cidco Lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपले हक्काचे स्वात:चे घर असावे असे कुणाला वाटणार नाही ? सध्या घरांचे दर हे गगनाला भिडले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो.२०२४ च्या लॉटरीचा विचार करता मुंबई मंडळासाठी म्हाडा आणि सिडको दोन्हीच्या लॉटरी जाहीर (Cidco Lottery) झाल्या आहेत.

म्हाडा कडून मुंबईसाठी 2030 घरांची तर सिडको कडून 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडाची ही घरं मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर- विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स, मालाड, गृहनिर्माण प्रकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे सिडको चा विचार केला तर कळंबोली, खारघर आणि घणसोली व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन येथे 902 घरांची उपलब्धता सिडकोच्या लॉटरी मध्ये करण्यात आली आहे. आता या दोन्ही साठी अनामत रक्कम किती (Cidco Lottery) भरावी लागणार याची माहिती आपण करून घेऊयात…

म्हाडा साठी अनामत रक्कम (Cidco Lottery)

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सोडत जाहीर केली. म्हाडाने अर्ज नोंदणीला देखील मुदतवाढ दिली ती 19 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्जाचा शुल्क 590 तर अनामत रक्कम दहा हजार, पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आहेत. ही रक्कम अत्यल्प अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न गट आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी अनुक्रमे असणार आहे.

सिडको साठी अनामत रक्कम (Cidco Lottery)

तर दुसरीकडे सिडकोच्या घरांसाठी अर्जाचा शुल्क हा जीएसटी सकट 295 रुपये इतका आहे. तर ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी 75 हजार रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. सिडकोच्या घरांसाठी अर्ज दाखल करण्याची (Cidco Lottery) अंतिम दिनांक 27 सप्टेंबर आहे.