Thursday, March 23, 2023

10 एमएलडी पाणीपुरवठा मिळावा यासाठी सिडकोचा एमआयडीसीकडे प्रस्ताव

- Advertisement -

औरंगाबाद | वाळूज महानगरातील पाणी प्रश्न दूर व्हावे यासाठी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये दररोज 10 एमएलडी पाणीपुरवठा व्हावा असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची या त्रासातून सुटका होईल. सध्या एमआयडीसीकडून सिडको वाळूज महानगरसाठी दररोज 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.

सिडको प्रशासन नागरिकांकडून 1 हजार लिटर पाण्यासाठी 22 रुपये वसुल करते. त्याचबरोबर सिडकोला एमआयडीसीकडून प्रति 1 हजार लिटर पाणी मिळण्यासाठी 16 रुपये द्यावे लागतात. आणि तांत्रिक बिघाड झाल्यास तसेच जलवाहिनी फुटल्यास एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद केला जातो. यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होते. सिडको वाळूजमहानगर परिसरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने या भागातील नागरिकांना सतत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडून सिडकोकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

सिडको परिसरात जवळपास 200 सोसायट्या असून, एमआयडीसीकडून मिळणारा 5 एमएलडी पाणीपुरवठा या सोसायट्यांसाठी अपूर्ण पडत आहे. एमआयडीसीने किमान दहा एमएलडी पाणीपुरवठा करावा, यासाठी महिनाभरापूर्वी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव दिला आहे. एमआयडीसीकडून यावर निर्णय होतो, हे पाहायचे आहे. असं कार्यकारी अभियंता कपिल राजपूत यांनी सांगितले.