हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) एका CISF गार्डने कानशिलात मारली असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार आज चंदीगड विमानतळावर घडला आहे. यावेळी कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. याचवेळी CISF गार्ड कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानशिलात मारली. यानंतर पोलिसांनी कुलविंदर कौरला अटक केली आहे.
सांगितले जात आहे की, मध्यंतरी कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केले होते. तिने केलेल्या याच वक्तव्याबाबत आक्रोश व्यक्त करत CISF गार्ड कुलविंदर कौरने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. सर्वात प्रथम
कंगना रणावत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आली असताना तिचा गेटवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. यानंतर CISF गार्डने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाजूने उभी राहिली होती. या निवडणुकीत मंडीच्या जनतेने कंगनाला बहुमतांनी विजयी केले आहे. या विजयानंतर पुन्हा दिल्लीला रवाना होत असताना कंगना राणावतबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित गार्डवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.