नवी दिल्ली | दिल्ली येथील इस्राईली दूतावासाजवळील स्फोटानंतर महत्वाच्या ठिकांणांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळ, महत्वाची स्थापना व सरकारी इमारतींवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून या ठिकांणांवरील सुरक्षा वाढवली असून सुरक्षा सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ एक कमी क्षमतेचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
स्फोटाचे स्वरूप अजून समजले नसून घटनास्थळी वाहनांच्या काचांचे तुकडे पडलेले आहेत. सध्या तरी या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत.
An alert has been issued at all airports, important installations and government buildings in view of blast reported in Delhi. Enhanced security measures have been put in place: Central Industrial Security Force pic.twitter.com/hWkTsTdJaX
— ANI (@ANI) January 29, 2021
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’