नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित होणं हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण – नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. सध्या या विधेयकाला बऱ्याच ठिकाणाहून तीव्र विरोध होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ”भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्या”चे त्यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे.

दरम्यान मोदी यांनी ‘राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झाल्याने मी आनंदी आहे. या विधेयकाच्या बाजूने ज्या सदस्यांनी मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानत आहे. जे निर्वासित वर्षानुवर्षे यातना सहन करत आहेत, त्यांची यातना हे विधेयक दूर करणार आहे’ असे ट्विट मध्ये नमूद केले आहे. तसेच भारतात आलेल्या विविध ६ धर्मीय निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यावरच बोट ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंधुभाव आणि दयेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

 

Leave a Comment