सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
वाई तालुक्यातील जोर-जांभळी गावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील अद्याप मदत मिळालेली नाही. या ठिकाणी जाण्यासाठी 18 किलोमीटरची पायपीट करावी लागते. तब्बल 5 दिवसांनंतर वाईच्या प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी जखमींना तात्काळ मदत करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह नागरिकांनी केली असता त्यांना प्रांताधिकाऱ्यानी उद्धटपणे उत्तर दिले. “माझे मी बघेन.. नाहीतर तुम्हीच जखमींना खांद्यावर घेऊन जावा, असे उद्धट दिल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील जोर-जांभळी येथे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून 5 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाच्यावतीने अद्याप कोणतीही मदत पोहचली नसल्याने ग्रामस्थ चांगलेत संतप्त झाले आहे. या ठिकाणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे हे कार्यकर्त्यांसोबत मदतकार्य केले जात आहे. दरम्यान तब्बल 5 दिवसांनंतर वाईच्या प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रान्ताधुकाऱ्यांची वादावादी झाली.
प्रांताधिकाऱ्यांनी पीडित व कार्यकर्त्यांना मी जखमींना खांद्यावर घेऊन जाऊ का? , अशा प्रकारे उद्धटपणे उत्तर दिल्यानंतर त्यांच्या उत्तरामुळे पीडित आणि काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.