18 ते 44 वयोगटातील नागरीक लसीकरणाच्या प्रतीक्षेत; लसीकरण बंद असल्याने नागरीक त्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील 18 ते 44 वयोगटातील जवळपास दोन लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्र शासनाच्या कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र त्यांना स्लॉट मिळाले नाहीत राज्य शासनाने या वयोगटाचे लसीकरणात बंद करून टाकले त्या मुळे नागरिक त्रस्त झाले असून लसीकरण कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कोविन ॲपवर नोंदणी केलेल्यांना चल्लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला काही दिवस प्रत्येक केंद्रावर फक्त 100 नागरिकांना सवलत देण्यात आली त्यानंतर ही संख्या 200 पर्यंत नेण्यात आली.

नोंदणीसाठी रात्री 8:30 वाजता कोविन ॲप सुरू करण्यात येत होते. अवघ्या 30 सेकंदामध्ये एका केंद्रावरील नोंदणी पूर्ण होत होती. अनेक नागरिक दररोज रात्री प्रयत्न करत होते. हजारो नागरिकांना स्लॉटच मिळत नव्हता अवघ्या काही दिवसानंतर शासनाने हे लसीकरण बंद करून टाकले.

शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर लसीकरण मोहीम सुरु होईल

कोविन ऍप नुसार लसीकरण करावे असे निर्देश शासनाने दिले होते. त्यादृष्टीने शहरात सहा केंद्र उघडण्यात आली. प्रत्येक केंद्रावर दररोज 200 नागरिकांना लस देण्यात येत होती. लसीचा साठा कमी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने अचानक या वयोगटातील लसीकरण मोहीम बंद केली. शासनाचा पुढील आदेश आल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू होईल.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

Leave a Comment