सोनेरी महल येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा

 

औरंगाबाद : येथील सोनेरी महल येथे वस्तुसंग्रहालय व पुरातत्व विभागाच्या वतीने जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

शहरातील सोनेरी महल या ऐतिहासिक वास्तूमध्ये ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.या महलात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे त्याबरोबरच येथे एक वस्तू संग्रहालय आहे ज्यात मराठवाड्यातील अनेक उत्खननात सापडलेल्या वस्तू, मुर्त्या, चित्र, ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष यांचे जतन केले आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक या संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतात मात्र लॉकडाऊनमुळे हे संग्रहालय सध्या बंद आहे.

त्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पुरातत्व विभागाच्या तंत्रसहायक नीलिमा मार्कंडेय, डॉ.कामाजी डक, संग्रहालयाचे वरीष्ठ लिपिक शेख सलीम,एकनाथ थोरात, मदनदास बैरागी, मनोज बनकर,राजू माळी, आकाश बोकडे हे कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीत होते.

You might also like