स्पीडब्रेकर हटवा नागरिकांचे होणारे अपघात टाळा…

Karad News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहरात चकाचक रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत. मात्र,अपेक्षित असलेल्यासंख्ये पेक्षा जास्त स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांचे अपघात होऊ लागले आहेत. हि परिस्थिती आहे, कराडहद्दीतील कराड-तासगाव रस्त्याची. या ठिकाणी पोलिस पेट्रोल पंपाजवळ
असलेल्या स्पीडब्रेकरमुळे दुचाकी वाहनचालकांचे अपघात होत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी फलक लावून स्पीडब्रेकर हटवण्याची मागणी केली आहे.

कराड शहरातील कराड ते तासगाव या मार्गावर असलेलया पोलीस चौकी पेट्रोल पंपाशेजारी आल्यावर या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवण्यात आलेला आहे. या स्पीडब्रेकरचा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनधारक पुरुष-महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कितेकजण या ठिकाणी स्पीडब्रेकरमुळे दुचाकी वाहनांवरून पडून जखमीही झाले आहेत. लहान मुले तसेच वृध्द यांना देखील या स्पिड ब्रेकरचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

संबधीत स्पीड ब्रेकर काढावा म्हणून कराड शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील नगरपालिका प्रशासनास निवेदने दिली. मात्र, निवेदन देऊन देखील संबंधित स्पीड ब्रेकर निघत नसल्यामुळे आज काही सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. त्या नागरिकांनी “आम्हा सर्वांची एकच मागणी गरज फक्त एका स्पीडब्रेकरची, स्पीडब्रेकर हटवा नागरिकांचे होणारे अपघात टाळा, स्पीड ब्रेकरमुळे माता भगिनींना होतात खूप त्रास, तिथून जाताना पडल्या सारखा होतो भास,” अशा आशयाचे पोस्टर संबंधित परिसरात लावले आहेत.

विशेष म्हणजे या परिसरात दोन स्पीड ब्रेकर आहेत ते काढून एकच करावा व नागरिकांना त्रास मुक्त करावे, ही मागणी सर्व नागरिकांमधून होत आहे. याच भावना आज बॅनरच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाला आता तरी जाग येणार का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.