…तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू; पंढरपूरवासियांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर कॉरिडोरच्या (corridor) मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. पंढरपूर कॉरिडोरला (corridor) स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याच मुद्यावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर उद्ध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू असं अश्वासन सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिले. यानंतर सोमवारी पंढरपूरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचा ठाराव मंजूर करण्यात आला.

हत्तीवरून मिरवणूक काढणार
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंढरपूरमधील कुठल्याही नागरिकाच्या घराला धक्का न लावता, कोणाचेही विस्थापन न करता पंढरपूरचा विकास करू, असं अश्वासन दिले. त्यामुळे जर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं, कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घोषणा या बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

पंढरपूर कॉरिडोरच्या (corridor) पार्श्वभूमीवर सोमवारी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक पंढरपूरमध्ये पार पडली. या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. सध्या तरी पंढरपूर कॉरिडोरला (corridor) स्थानिकांचा मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या