व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नगरपरिषदेला “आगाशिवनगर-मलकापूर नगरपरिषद” असे नाव द्या, अन्यथा आंदोलन करू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

मलकापूर शहरातील महत्वाचा भाग असलेल्या आगाशिवनगरला महत्व देण्या संदर्भात आज आगाशिवनगर येथील नागरिकांनी मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्यधिकाकरी व नगराध्यक्षांची आज भेट घेतली. यावेळी मलकापूर नगरपरिषदेला आगाशिवनगर मलकापूर नगरपरिषद असे नाव द्यावे,” अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. तसेच सध्या सुरू असलेल्या अभियानात आगाशिवनगर या नावाचा समावेश ठळकपणे करावा. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशारा आगाशिवनगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला.

आगाशिवनगर येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आपले शहरातून आशियाई मार्ग जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेला आहे. आगाशिवनगर हा तलाठी सज्जा स्वतंत्र आहे. शिवाय आगाशिवनगर भागातून शहराला मिळणा महसूल जास्त आहे. याचा विचार करता नगरपरिषदेला “आगाशिवनगर-मलकापूर” नगरपरिषद ते नाव द्यावे.

मलकापुरचा उल्लेख करताना आगाशिवनगर या नावाला डावलले जात असल्याची जनभावना तयार होत आहे. त्यामुळे कोणताही सेल्फी पॉईंट किंवा नाव असलेला उपक्रम राबवताना प्राधान्याने आगाशिवनगर या नावाचा उल्लेख करावा. आपल्या शहरात सध्या मलकापूर नगरपरिषदेच्यावतीने लोकसहभागातून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. 15 दिवसाच्या मुदतीमध्ये योग्य तो निर्णय न घेतल्यास आम्ही सर्व नागरिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा आगाशिवनगर नागरिकांच्यावतीने करण्यात आला आहे.