शहरात वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात जालना रोडवर वाहतूक नियोजन कोलमडल्याचे दिसत आहे. शहरात गुलमंडी, शहागंज, सिटी चौक, औरंगपुरा, चौराह, राजाबाजार या बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सुद्धा ग्राहकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठ असलेल्या भागात अरुंद रस्ता त्यात दुकानदार आणि ग्राहक रस्त्यात गाडी उभी करतात. यामुळे जास्त वाहतूक कोंडी होते.

शहरातील वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. तरीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक मेन रस्त्या सोबतच बाजारपेठांच्या ठिकाणी देखील वाहतूकीची कोंडी होत आहे.  आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस असून देखील वाहनधारक सिग्नल तोडून त्यांचे वाहन काढताना दिसले.

कोणत्याही चौकातील डाव्या लेनवर एकही गाडी जाणार नाही याची काळजी तेथे असलेले वाहतूक पोलीस घेत असतात. परंतु मंगळवारी क्रांतिचौक, गोपाल टीकडे जाताना वाहतूक कोंडीमुळे या लेन वर सुद्धा वाहने उभी होती. गोपालटीकडे जाणाऱ्या वाहतूकीमुळे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनधारकांना देखील विनाकारण या कोंडीत अडकून राहावे लागले.

Leave a Comment