Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच ; किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू

Citroen C3 Aircross Launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Citroen C3 Aircross : फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी Citroen ने भारतीय बाजारपेठेत ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह Citroen C3 Aircross कार लाँच केली आहे. हि कार Max, Plus आणि Maxx (5+2 SEAT) अशा ३ व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आली आहे. या SUV कारची किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू होत असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. तुम्ही Citroën India वेबसाइटला भेट देऊन 25,000 रुपयांत या SUV कारचे बुकिंग करु शकता. आज आपण या कारचे खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात….

लूक आणि डिझाईन

या अपडेटेड Citroen C3 Aircross ची लांबी 4,323 मिमी, रुंदी 1,796 मिमी आणि उंची 1,665 मिमी आहे. गाडीला 2,671 मिमी व्हीलबेस आणि 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स सुद्धा मिळतोय. गाडीच्या लूक आणि डिझाईन बद्दल सांगायच झाल्यास, कारच्या समोरील बाजूला तुम्हाला स्प्लिट क्रोम ग्रिल आणि हेडलॅम्प क्लस्टर्स दिसेल. हेडलॅम्प्सप्रमाणे, गाडीच्या रॅपराऊंड टेललँपमध्ये स्प्लिट सेटअप आहे. या SUV कार मध्ये वायरलेस Apple CarPlay, Android Auto सह 10.2-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्ये फीचर्स मिळतात.

इंजिन –

Citroen C3 Aircross Automatic ही SUV कार खास करून शहरात फिरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या गाडीमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडलेलं असून 5,500 rpm वर 110 PS ची पॉवर आणि 1,750 rpm वर 190 Nm टॉर्क जनरेट करते. नव्या इंजिनमुळे ही कार अतिरिक्त टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे कि C3 Aircross 18.5 किलोमीटर प्रतिलिटर अंतर पार करू शकते.

किंमत किती ? Citroen C3 Aircross

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Citroen C3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक प्लस 5 सीटरची एक्स-शोरूम किंमत 12,84,800 रुपये आहे. तर मॅक्स ऑटोमॅटिक 5 सीटरची एक्स-शोरूम किंमत 13,49,800 आहे. याशिवाय, मॅक्स ऑटोमॅटिक (5+2) सीटरची किंमत13,84,800 रुपये इतकी आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला La Maison Citroën डीलरशिप किंवा अधिकृत Citroën India वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि 25,000 रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करावं लागेल.