हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सरन्यायाधीश बोबडे यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी सुनवाणी झाली आहे. या प्रकरणात भाजपाच्या वतीनं ज्येष्ठ वकील गौरव भाटिया बाजू मांडत होते, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात उभे होते.
तृणमूल सरकारच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात भाजपच्या याचिकेला विरोध केला. एखादा राजकीय पक्ष याचिका करू शकते का, हे कोर्टानं तपासावं, असं कपिल सिब्बल यांचं मत होतं. त्यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी दोन्ही पक्षकारांना चांगलंच फटकारलं. बोबडे म्हणाले कि,”आम्हाला कल्पना आहे की दोन्ही बाजूचे लोक राजकीय हेतूने कोर्टाचा राजकारणासाठी कोर्टाचा वापर करत आहेत.” असं करण्यापेक्षा तुम्ही लोक टीव्ही चॅनेल्सवर जा. तेथे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळवायची ती मिळवा असा खोचक सल्लाही सरन्यायाधीश बोबडे यांनी दिला.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
भीमा – कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?
जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू- भाजप खासदार
नागपूरमध्ये १९ वर्षीय मुलीवर बलात्कार, क्रूरतेमध्ये निर्भया कांडाची पुनरावृत्ती