Wednesday, February 1, 2023

कराड जनता बँकेच्या सर्व शाखांमध्ये उद्यापासून क्लेम फाॅर्म, KYC घेण्यात येणार ; ठेवीदारांसाठी महत्वाची माहिती

- Advertisement -

कराड दि.14 (प्रतिनिधी) : दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्याने दिवाळखोरीत निघालेल्या या बॅंकेतील पैसे संबधित खातेदाराला परत मिळवण्यासाठी नव्याने केवायसी साठीची कागदपत्रे वेळेत दिली तरच आपलै पैसे मिळतील अशा अशायाचे जाहिर निवेदन बॅंकेचे अवसायांकीनी प्रशिध्दीला दिले आहे.

बॅंकेतील ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत देण्यासाठी अवसायकांने काही निर्णय घेतले असून बँकेच्या विविध जिल्हय़ातील शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म व केवायसी फॉर्म भरून घेण्यास उद्या मंगळवार 15 डिसेंबर पासून प्रारंभ होणार असल्याचे जाहिर निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या बँकेच्या सर्व ठेवींना 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण आहे,या बँकेचा परवाना रद्द करताना रिझर्व्ह बँकेने 99 टक्के ठेवीदारांचे 5 लाखाच्या आतील पैसे परत करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे गेल्या आठवडय़ात ठेव विमा व पतहमी कार्पोरेशनच्या अधिकाऱयांबरोबर बँक अधिकाऱयांची बैठक होऊन ठेवीदारांची नव्याने केवायसी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सबंधित अवसायक यांनी बँकेच्या कराड येथिल मुख्य कार्यालयासह सात जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म व केवायसी फॉर्म भरून घेण्याची सूविधा उद्या मंगळवार 15 पासून सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत ठेवीदारांना अवसायाक यांनी आवाहन केले आहे की, ठेव विमा व पतहमी कार्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून बँकेच्या सर्व ठेवीदारांना एकुण 5 लाखापर्यंतची रक्कम परत मिळण्यासाठी क्लेम फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. हे क्लेम फॉर्म बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध केले आहेत त्यामूळे बॅंकेच्या सर्व ठेवीदारांनी हे फॉर्म घेऊन ते भरून बॅंकेत द्यावेत. त्यासोबत आपली केवायसी कागदपत्रे जोडून ती नजीकच्या शाखेत जमा करायची आहेत, हे फॉर्म भरून दिले नाही तर आपल्या ठेवी परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’