Cleaning Hacks : घरामध्ये शक्यतो कुणी औषधे घेतली नसतील अशी घरे सापडणार नाहीत . प्रत्येक घरात कधी ना कधी टॅब्लेट्स , गोळ्या औषधे विकत घेतली असतीलच ओषधे संपल्यानंतर आपण त्याची पाकिटे फेकून देतो. मात्र ही पाकिटे (Cleaning Hacks) फेकून न देता तुम्ही त्याचा तुमच्या किचनमध्ये चांगल्या प्रकारे वापर करू शकता. चला पाहूया नक्की काय आणि कशासाठी उपयोगात येतील हि टाकाऊ औषधाची पाकिटे …
करपलेला पॅन
अनेकदा चिकट तेलकट पदार्थ तयार केल्यानंतर पॅनमध्ये काळा असा थर तयार होतो. जो काढण्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात. असे चिकट चिवट डाग असलेले पॅन तुम्हाला काढायचे असतील तर त्यासाठी त्या पॅनवर मीठ, सोडा आणि इनो घाला त्यानंतर थोडं गरम पाणी टाका आणि त्यानंतर तुम्ही हा पॅन औषधाच्या रॅपर (Cleaning Hacks) च्या मदतीने दोन-चार मिनिटे घासून घ्या. त्याच्यानंतर सगळे चिवट चिकट डाग निघून जातील आणि तुमचा पॅन चकाचक होईल.
कात्रीला धार (Cleaning Hacks)
कात्रीला जर धार करायची असेल तर सर्वात सोपी अशी ही ट्रिक आहे. औषधांचे रॅपर (Cleaning Hacks) वापरून तुम्ही तुमची कात्री धारदार करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर औषधाचे रिकामे रॅपर घ्या त्याचे छोटे छोटे तुकडे करा. दोन-तीन मिनिटे सलग असं केल्यानंतर तुमच्या कात्रीची धार तीक्ष्ण होईल.
मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड करा तीक्ष्ण
मिक्सर ग्राइंडर वारंवार वापरून त्याच्या ब्लेडची धार ही कमी होते ही धार वाढवायची असेल तर औषधाच्या (Cleaning Hacks) आवरणाचे छोटे छोटे तुकडे कात्रीने कापून घ्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घ्या. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मिक्सर ग्राइंडर ब्लेडची धार तीक्ष्ण करू शकता.