Cleaning Hacks : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे फ्रीजचा वापर जास्त होतो. पण तुम्हाला माहितीच असेल. फ्रिज साफ करण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही फ्रिजचे रबर साफ करणे म्हणजे मोठे कटकटीचे काम. फ्रिज साफ केला तरी त्याचे रबर साफ करणे बहुदा विसरून जाते. त्यामुळे फ्रिजचे कुलिंग खराब होते. झुरळांसारखे कीटक त्यामध्ये अडकून राहतात. त्यामुळे फ्रिज लवकर (Cleaning Hacks) खराब होतो. म्हणूनच आजच्या लेखात आपण रबर कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. चला जाणून घेऊया काही सोप्या ट्रिक्स
लिक्विड डिश बेकिंग सोडा आणि विनेगर (Cleaning Hacks)
ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्यावं लागेल. त्यामध्ये एक चमचा लिक्विड डिश वॉश मिक्स करा. त्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आहे. आता फ्रीजच्या डोअर रबर वर हे तयार मिश्रण स्प्रे करा. पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा त्यानंतर ब्रशने स्वच्छ करून घ्या.
कोमट पाणी (Cleaning Hacks)
कोमट पाण्याने देखील फ्रीजच्या डोव्हरच्या रबर वर साचलेली घाण स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात (Cleaning Hacks) त्यात कोमट पाणी घ्या. त्यामध्ये सुती कापड भिजवा आणि रबर पुसून घ्या.
टूथपेस्ट
ही ट्रिक वापरण्यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. यानंतर टूथ ब्रशने रबर घासा. रबर स्वच्छ (Cleaning Hacks) घासल्यानंतर पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा. पाच मिनिटानंतर सुती कापडाने डोअर रबर स्वच्छ पुसून काढा.