कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील चचेगांव गावातील स्मशानभूमीला पूराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे अत्यंविधी करण्यासाठी गैरसोय होत असल्याने गावातील युवकांनी स्वच्छता मोहिम राबविली होती. युवकांच्या या कामांचे ग्रामस्थांच्याकडून काैतुक होत आहे.
पश्चिम महाराष्ट्राला पावसाने मुसळधार हजेरी लावलेली होती. सातारा जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती आलेली होती. या पूराच्या पाण्याचा फटका अनेक गावांना बसला होता. यामध्ये प्रामुख्याने कोयना नदीकाठच्या गावात मातीचा गाळ, कचरा साठलेला असल्याचे पहायला मिळत आहे. तेव्हा कराड तालुक्यातील चचेगाव येथील तरूणांनी गावातील रस्त्यावर, स्मशानभूमीत साचलेला गाळ व कचरा काढण्यासाठी पूर्ण दिवस स्वच्छता केली.
पावसाच्या वातावरणामुळे गावात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहिम राबविल्याचे युवक सांगत आहे. स्वच्छता मोहिमेसाठी कृष्णा कारखान्यांच्या अग्निशामकचीही मदत झाली.