सातारा नगर भूमापनचा लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तहसील कार्यालयातील नगर भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक (क्लार्क वर्ग-3) शामराव शंकर बांदल (वय- 54, मूळ रा. बिभवी, ता. जावली. सध्या रा.रामकुंड, पुष्प जोतिबा अपार्टमेंट, सातारा) याला 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत एलसीबीकडे एका 50 वर्षीय व्यक्तीने तक्रारदार केली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी, मोजणी नकाशामध्ये अतिक्रमण केलेल्या व्यक्तीची नोंद प्रकरण घेऊन ते प्रकरण मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लिपिकाने 5000/- रुपये लाच मागणी करून 5 हजार रुपये लाच स्वीकारली. लाच घेताना शामराव बांदल याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणाची पडताळणी दिनांक 25 आॅगस्ट रोजी करण्यात आली. तर 26/08/2022 रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली. तसेच एलसीबीने 5,000/- रूपये जप्त केले.

पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक, भुमी अभिलेख, पुणे प्रदेश पुणे. अति. कार्यभार ला. प्र. वि. सातारा सुजय घाटगे यांच्या सूचनेनुसार सातारा एलसीबी टीममधील सचिन अंकुश राऊत, पोलीस निरीक्षक, पो. ना. राजे, काटकर, पो. कॉ. येवले, भोसले यांनी कारवाई केली.