व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बदलत्या हवामानाचा फटका : वाई तालुक्यात मेंढपाळच्या 20 बकरीचा गारठ्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे बुधवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे देगाव येथे शिवारात असलेल्या 20 बकरी गारठून मृत्युमुखी पडल्या आहेत. तर 10 बकरी अंत्यवस्थेत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मेंढपाळ व शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

सातारा जिल्ह्यात गेले दोन दिवस पावासाने जोरदार हजेरी लावलेली आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी मध्यरात्री भिरडाचीवाडी भुईंज येथील शिवाजी शंकर धायगुडे या मेंढपाळची बकरी देगाव येथील शिवारात होती. बुधवारी रात्री अचानक वाढलेला पाऊस व हवामानात वाढलेला गारटा यामुळे बकरींचा मृत्यू झाला. सकाळी आठ वाजता एकूण 20 बकरी मयत झाल्याने व दहा अत्यवस्थेत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

मेंढपाळाच्या 20 बकरी मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळताच वाईचे तहसीलदार रणजित भोसले याना मिळताच त्यांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पाठवली. तसेच स्वतः नुकसानीची माहिती घेवून घटनास्थळी भेट दिली. मोठ्या प्रमाणावर बकरीच्या मृत्यूमुळे परिसरातील लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.