‘क्लायमेट चेंज’ प्रोटेस्टमध्ये सहभागी झालेला ‘जोकर’ अभिनेता वोकीन फीनिक्सला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | गोल्ड ग्लोबल अवाॅर्ड विजेता आणि हाॅलिवूड सिनेमा ‘जोकर’चा अभिनेता वोकीन फीनिक्स याला शुक्रवारी वाॅशिंग्टन डीसीमध्ये अटक करण्यात आली. वाॅशिंग्टन डीसीमध्ये हाॅलिवूड अभिनेत्री जेन फोंडा हीने द् फायर ड्रील फ्रायडे या नावाने हवामान बदलाविरूद्ध आंदोलनाचं आयोजन केलं होतं. या आंदोलनामध्ये वोकीन फीनिक्सशिवाय मार्टिन शीन, मॅगी जिलेनहाॅल हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनामध्ये वोकीनने या हवामना बदलचा मटण आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उद्योगांवर कसा परिणाम होतो यावर भाषण दिलं.

https://www.instagram.com/p/B7Jm-VhCAOZ/?utm_source=ig_web_copy_link

आंदोलनात आलेल्या १४७ जणांना वाॅशिंग्टन डीसी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलनासाठी अटक केली.
वोकीन फीनिक्सच्या भाषणाचे फोटो आणि विडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/tv/B7JgGtsCacx/?utm_source=ig_web_copy_link

ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत जेन फोंडासहित इतर अभिनेते सॅम वाॅटरसन, टेड डॅनसन, रोजेन आॅर्कुट यांसारख्यांना सविनय आज्ञाभंगासाठी अटक करण्यात आली होती. कारण यांनी ग्रीन न्यू डीलसहित अन्य मागण्या आंदोलनात करत होते.

Leave a Comment