Tuesday, June 6, 2023

कार्वेनाका येथे बंद फ्लॅट फोडला : चोरट्यांनी अडीच लाखाचे दागिने केले लंपास

कराड | शहरातील कार्वेनाका येथे बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील अडीच लाखाचे दागिने लंपास केले. कार्वेनाका येथे थोरात हॉस्पिटलशेजारी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव (रा. मलकापूर) यांनी रविवारी रात्री कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 44 हजार रुपयांचे मंगळसुत्र, 44 हजार रुपयांचे झुमके, 13 हजार 200 रुपयांचे कानातील टॉप्स, 13 हजार 200 बुगडी, 22 हजार रुपयांची अंगठी, 17 हजार 600 रुपयांची अंगठी, 13 हजार 200 रुपयांचे बदाम, 36 हजार 600 रुपयांच्या दोन वेढणी अंगठ्या, 17 हजार 600 रुपयांच्या कानातील दोन रिंग, 8 हजार 800 रुपयांची नथ, 8 हजार 800 रुपयांच्या लहान मुलांच्या 5 अंगठ्या व 4 बदाम, 15 हजार रुपयांची चांदीची वाटी, शिक्का, पैंजण, वाळे, कमरपट्टा, जोडण्या आदी 2 लाख 59 हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.

याबाबत संतोष कदम यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.