Cloth Hacks : फॉर्मल शर्टस पुरुषांना शोभून दिसतात. शिवाय ऑफिसवेअर म्हणून जास्तीत जास्त लोक फॉर्मल शर्ट्स घालणे पसंत करतात. त्यातही लाईट आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट सर्रास वापरले जातात. मात्र धूळ, धूर, मानेवरील घाम यामुळे शर्ट्स ची कॉलर इतकी घाण (Cloth Hacks) होते की बस्स ! मग हे असे शर्ट्स साफ करण्यासाठी गृहिणी बराचवेळ मेहनत करीत असतात.
सध्या अनेक घरांमध्ये वॉशिंग मशीन असले तरी कफ आणि कॉलरचे चिवट डाग मशीन (Cloth Hacks) मध्ये निघत नाही. त्यासाठी शर्ट वेगळे घासून मग मशीन मध्ये टाकावे लागतात. मशिन्स स्वच्छ कपडे धुण्याचे दावे करीत असले तरी शर्ट्स चे कॉलर चे डाग एका मशीन वॉश मध्ये निघत नाहीत हेच खरे ! आजच्या लेखात आम्ही तुमच्या कॉलर साफ करण्याचा एक सोपा आणि भारी फंडा आणला आहे ज्यामुळे कमी मेहनतीत कॉलर एकदम चकाचक होईल. आता ही ट्रिक नक्की काय आहे ? (Cloth Hacks) त्यासाठी कोणते साहित्य लागते चला पाहुयात…
- चिवट डाग असलेली शर्टची कॉलर साफ करण्यासाठी (Cloth Hacks) आधी शर्ट ओला करा.
- आता त्या कॉलरवर टूथपेस्ट लावा. त्यावर मीठ टाका.
- आता कॉलर ५ मिनिटे हातावर घासून घ्या.
- त्यानंतर साबणचुरा किंवा साबण लावून नेहमीप्रमाणे कॉलर धुवून घ्या
लक्षात ठेवा
ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की धूर (Cloth Hacks) आणि धुळीसोबतच मानेवरील घामामुळे कॉलर घाण होते. त्यासाठी मानेला टेलकम पावडर लावा. स्वच्छता राखा.